शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आई-वडिलांचे भांडण सोडवायला गेला, बापाने मुलावर बंदुकीतून छरा झाडला

By संजय पाटील | Updated: April 11, 2024 17:23 IST

मुलगा जखमी; बापाला अटक

कऱ्हाड : आई-वडिलांचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या मुलावर बापाने बंदुकीतून छरा झाडला. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरूवारी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फारुख मुसा शेख (वय ४५, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर छरा लागून वसिम फारुख शेख (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत हसीना फारुक शेख यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीत राहणारा फारुख शेख हा वारंवार पत्नी हसीना यांना शिविगाळ, दमदाटी करुन मारहाण करीत होता. बुधवारी रात्रीही त्याने हसीना यांच्याशी वाद घातला. त्यावेळी मुलगा वसीम याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता फारुखने चिडून जावून त्याच्यावर  बंदुकीतून छरा झाडला.छरा लागल्यामुळे वसिम जखमी झाला. जखमी वसिमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीKaradकराडPoliceपोलिस