शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडीची ख्याती पोहोचली भारतभर, ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:12 IST

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : केंद्रीयस्तरावर घेतली दखल

सातारा : विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या व राज्यातील पहिले सौरग्राम ठरलेल्या मान्याचीवाडीची ख्याती आता देशभर पसरली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या ‘एक्स’ (ट्विटर) प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारने मान्याचीवाडीची माहिती आता देशाला दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ ऑगस्ट रोजी सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाचे ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ म्हणून लोकार्पण झाले होते. राज्यातील या कामाची दखल केंद्रीय अपारंपरिक मंत्रालयाच्या अखत्यारित ‘प्रधानमंत्री सूर्यघर-मोफत वीज योजनेच्या’ एक्स प्लॅटफॉर्मने घेतली असून मान्याचीवाडीने शून्य वीजबिलाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे संदेशात म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही मान्याचीवाडीची पहिले सौरग्राम म्हणून दखल घेतली आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेली मान्याचीवाडी तसे छोटेसे गाव आहे. या गावात एकूण वीज ग्राहकांची संख्या १०२ आहे. यामध्ये घरगुती ९७, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे प्रत्येकी एक तर सार्वजनिक सेवा वर्गवारीतील २ ग्राहकांचा समावेश आहे. गावचा वीजवापर दरमहा सरासरी साडेपाच हजार युनिटच्या घरांत असतो. यापूर्वी या गावाने महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेत छापील वीजबिल नाकारून सवलत घेतली होती. त्यामुळे मान्याचीवाडीचे उपक्रमशील सरपंच रवींद्र माने यांना महावितरणने प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजनेची माहिती दिली. सरपंच माने यांनीही त्यास प्रतिसाद दिला.२५ जूनला ग्रामसभा घेत मान्याचीवाडीने सूर्यघर योजनेत १०० टक्के सहभाग घेण्याचा निर्धार केला. त्यासाठी लागणारी तांत्रिक गरज पूर्ण करत महावितरणने नवीन वीज रोहित्र उभारून क्षमतावाढ केली. प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविण्याचे ठरले आणि अवघ्या दीड महिन्यात गावातील १०२ वीज जोडण्या सौर ऊर्जेवर रूपांतरीत झाल्या.

महिन्याला १३ हजार युनिट वीजनिर्मितीघरगुती वगळता पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालयासाठी जादा भाराची सौर प्रणाली बसविल्यामुळे गावाची सौर क्षमता १०९ किलोवॅट झाली आहे. एक किलोवॅटचा सौर संच महिन्याला साधारणत: १२० युनिट वीज निर्मिती करणार असून, गावात दरमहा १३ हजार युनिट वीज तयार होणार आहे. त्यामुळे गाव विजेच्या बाबतीत शंभर टक्के स्वयंपूर्ण झाले आहे.

लाभ घेण्याचे आवाहनइतर गावांनीही मान्याचीवाडीचा आदर्श घेऊन वीजबिल मुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकावे. यासाठी महावितरण गावागावांत घरोघरी सूर्यघर योजनेचा प्रसार करीत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCentral Governmentकेंद्र सरकार