शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 11:15 IST

आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला

कराड : येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या  वस्तीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपुर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र भयावह आगीत २४ घरे जळून खाक झाली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे न्यायालयाच्या समोरील बाजूस बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आहे. या परिसराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली. एका घराला लागलेली आग वेगाने वाढत गेली. आग लागल्याने महिलांसह नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील इतर घरात झोपलेल्या कुटूंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत गेली.आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला. सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने शहरात खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांसह पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीत २४ घरातील साहित्य जळून खाक झाले होते.उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमुऴे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यांची तात्पुरती राहण्याची सोय नगरपरिषद शाळा क्रमांक तीन येथे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग