शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

Satara: चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली; पुण्याचे चौघे जखमी

By संजय पाटील | Updated: April 1, 2024 17:14 IST

कऱ्हाड : कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेने निघोलेली कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन ...

कऱ्हाड : कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेने निघोलेली कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटकेटप्पा, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी हा अपघात झाला.संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर भिसे (४५) व साक्षी शेलार (५३, सर्वजण रा. दह्यारी-हवेली, पुणे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. अपघातस्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दह्यारी-पुणे येथील चौघेजण कारमधून (क्र. एमएच १२ आरके ४०२१) नागरमुनोळीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी ते सर्वजण कारमधून पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले. संबंधित कार आटकेटप्पा येथे आली असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार महामार्गाच्या नव्याने बांधलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भिषण होती की, कारच्या समोरील भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला. तर कारमधील चौघे गंभीर जखमी झाले.वाहतूक काहीकाळ विस्कळीत अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्गावरील प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तर दुपारी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार महामार्गावरुन बाजुला घेण्यात आली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAccidentअपघातhighwayमहामार्ग