शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नीरा नदीमध्ये आढळलेला मृतदेह पुण्यातील युवतीचा, आत्महत्या की घातपात?; पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:45 IST

युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना ७२ तासात यश

मुराद पटेलशिरवळ : नीरा नदीमध्ये आढळलेल्या युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना ७२ तासात यश आले. नेहा शरद पिलाणे (वय २०, मूळ रा.वांगणी ता.वेल्हा जि.पुणे, सध्या रा.जयनाथ चौक,धनकवडी,पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीने आत्महत्या केली आहे की घातपात झाला याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरु आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिदेंवाडी ता.खंडाळा येथील नीरा नदीच्यापाञात रविवार (दि.१५) मकर संक्रांतीदिवशी एका युवतीचा सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता. याबाबतची शिरवळ पोलिस स्टेशनला आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली होती. संबंधित युवतीची ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले होते. पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलिस अंमलदार नितीन महांगरे, प्रशांत वाघमारे, दिपक पालेपवाड यांच्या पथकाला तपासादरम्यान संबंधित युवती ही पुणे शहरातील नेहा पिलाणे असल्याची माहिती मिळाली. नेहा बेपत्ता असल्याची नोंद पुणे शहर येथील सहकारनगर पोलिस स्टेशनला होती.शिरवळ पोलिसांनी याबाबत नातेवाईकांशी संपर्क साधला असता तो मृतदेह नेहा पिलाणे हिचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नेहाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस