शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Satara: सायकल चालवण्याची हौस मुलाने चोरी करून भागवली!

By दत्ता यादव | Updated: March 12, 2024 15:41 IST

३५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल चोरी

सातारा : लहान मुलांना खेळण्यातील कोणत्याही वस्तूंचे प्रचंड आकर्षण असते. अशा वस्तू मिळण्यासाठी मुले आपल्या आई-वडिलांकडे हट्ट धरतात. परंतु, जर हवी ती वस्तू मिळाली नाही तर मग अशी काही हट्टी मुले वाट्टेल ते करायला मागे-पुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला. घरची हलाखीची परिस्थिती. म्हणून सहावीतल्या मुलाने सायकल चालविण्याची हाैस चक्क चोरी करून भागवली; पण कोवळ्या वयात त्याने केलेला हा गुन्हा त्याच्या पालकांना विचार करायला लावून गेला.जिल्हा परिषदेसमोर एक खासगी क्लास आहे. या क्लासच्या पार्किंगमधून काही दिवसांपूर्वी सुमारे ३५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल चोरीस गेली होती. याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली होती. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या इलेक्ट्रिक सायकल चोरीचा तपास करत होते. क्लास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर एक लहान मुलगा सायकल चोरून नेत असताना दिसून आला.पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाने चोरी केल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या आई-वडिलांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. ‘तू सायकल चोरली आहेस का,’ अशी पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र, त्याने नकार दिला. सीसीटीव्हीत दिसत असतानाही तो धडधडीत आई-वडिलांसमोर खोटे बोलत होता. याचे कारण आई-वडील रागावतील, याची त्याला भीती वाटत होती. अखेर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सायकल चोरीबाबत पुन्हा विचारले असता त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. ‘मला घरातल्यांनी सायकल घेऊन दिली आहे. परंतु, माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल नाही. त्यामुळे मी ही इलेक्ट्रिक सायकल चोरली असल्याचे त्याने कबूल केले. ‘सायकल घरी आणली तर आई -वडील विचारतील, एवढी महागडी सायकल तू आणलीस कोठून,’ त्यामुळे सायकल घरी आणत नव्हतो. शाळा सुटल्यानंतर परिसरात तो इलेक्ट्रिक सायकलवरून फेरफटका मारायचा. त्यानंतर घराच्या परिसरातील झाडीत सायकल लपवून ठेवून तो घरी यायचा.आपला मुलगा चोरी करू शकतो, यावर आई-वडिलांचा बराचवेळ विश्वास बसला नाही. आमच्या परिस्थितीनुसार त्याला सायकल घेऊन दिली. मात्र, इलेक्ट्रिक सायकल घेऊन देण्याची आमची ऐपत नाही. आम्हीच मुलाला घडविण्यात कमी पडलो, अशी खंतही त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखवली.

आपल्या मुलांशी पालकांनी मैत्री करावी. त्यांच्या मनातील भाव जाणून घ्यावेत. मुलांशी प्रेमाने वागल्यास कोवळ्या वयात घडणारे अनुचित प्रकार रोखले जातील. मुलांशी सातत्याने संवाद आवश्यक आहे. -राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक, सातारा शहर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस