शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाडी घासली अन् त्याने थेट बंदूकच काढली, सातारा जिल्ह्यातील निंबळक येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:50 IST

फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

फलटण : निंबळक, ता. फलटण गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावर चारचाकी व दोनचाकी एकमेकांना घासल्याच्या कारणावरून चारचाकीतील माजी सैनिकाने बंदूक बाहेर काढून दहशत पसरविल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. १७ रोजी घडली.याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी पिस्टल, एक काडतूूस व चारचाकी असा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रय बाबू महारनूर (वय ४९, ऋषिकेशवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे बंदूक दाखवलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.माजी सैनिक दत्तात्रय महारनूर हे त्यांच्या चारचाकी (एमएच १२ यूएस ९५३५) मधून पंढरपूर ते पुणे असा प्रवास करीत होते. निंबळक गावाच्या हद्दीत दुचाकी चारचाकीला घासल्याच्या कारणावरून त्यांची दुचाकीस्वार विक्रम आडके यांच्याशी शाब्दिक वाद सुरू झाला. त्यामध्ये दत्तात्रय महारनूर यांनी त्यांच्याकडील पिस्टल बाहेर काढल्याची माहिती लोकांकडून फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान राखून कोणताही अनुचित प्रकार व जीवितहानी होऊ न देता दत्तात्रय महारनूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या हातातील एक पिस्टल, एक जिवंत काडतूस व चारचाकी असा ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस