शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च ! 

By प्रमोद सुकरे | Updated: April 2, 2025 19:36 IST

तिसऱ्या पनेलला मोठा धक्का

कराड : यशवंतनगर (ता.कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक येत्या ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच बुधवारी उच्च न्यायालयाने सत्ताधारी विरोधात असलेल्या तिसऱ्या पॅनेलचे प्रमुख व कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या पनेलला हा मोठा धक्का मानला जात आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत छाननीत अवैध झालेल्या उमेदवारांपैकी १० जणांनी प्रादेशिक संचालक पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्यात १० पैकी ९ जणांचे अर्ज पुन्हा वैद्य करण्यात आले. पैकी निवास थोरात यांचा एक अर्ज वैध झाला होता. पण त्यांच्या अर्जावर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हरकतदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले.त्यामुळे ही न्यायालयीन लढाई चर्चेची बनली होती.या हरकतीमुळे न्यायालयात मंगळवार दि.२५ ते शुक्रवार दि.२८ अशी सलग ४ दिवस सुनावणी झाली. तरी देखील न्यायालयाने मंगळवार दि.१ रोजी पुन्हा सुनावणी ठेवली होती.त्यानुसार सुनावणी संपन्न झाली.यावर बुधवार दि.२ रोजी निकाल देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दरम्यान न्यायालयाने बुधवारी सकाळी याबाबतचा निकाल जाहीर केला. त्यात निवास थोरात यांचा प्रादेशिक सहसंचालकांनी वैद्य ठरवलेला उमेदवारी अर्ज न्यायालयाने अवैध केला आहे. त्यामुळे अगोदरच २ उमेदवार कमी असणाऱ्या अन् आता पनेल प्रमुखांचाच अर्ज अवैध झाल्याने या पॅनेलला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

निवास थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर माझ्यासमोर हरकत घेण्यात आली होती.मी याबाबत पडताळणी करुन हा अर्ज अवैध केला होता. त्यावर थोरात यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. तेथे त्यांचा अर्ज वैद्य ठरला होता. त्यानंतर हरकतदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बुधवारी प्रादेशिक सहसंचालकांनी घेतलेला निर्णयाला स्थगिती दिल्याने त्यांचा अर्ज पुन्हा अवैध झाला आहे. - संजीवकुमार सुद्रिक निवडणूक निर्णय अधिकारी 

निवास थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेतली होती. आमची हरकत बरोबर असल्यानेच त्यांचा अर्ज सुरुवातीला अवैध करण्यात आला. मात्र त्यांनी केलेल्या अपिलात प्रादेशिक सहसंचालकांनी तो अर्ज पुन्हा कसा वैद्य केला हे आम्हाला समजले नाही. मात्र आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत.म्हणून त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. अखेर बुधवारी त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याचे समाधान वाटते.  - राजू शेळके,  जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस