शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

Satara: नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवतीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, मित्रास चौकशीसाठी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:07 IST

तिसऱ्या दिवशी मृतदेह लागला हाती

मुराद पटेलशिरवळ : हरतळी ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पाञात वरुड येथील वाहून गेलेल्या युवतीचा मृतदेह नदीपाञात तिसऱ्या दिवशी सापडला. तेजल उर्फ तेजू आप्पासो साळूंखे (वय 23, रा.वरुड ता.खटाव जि.सातारा सध्या रा.भोर जि.पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टिम व शिरवळ रेस्क्यू टिम यांच्या सहकार्याने शिरवळ पोलिसांकडून शोधमोहिम सूरु होती. अखेर तिसऱ्या दिवशी रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी मिञ दिंगबर साळेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वेलवंडी नदी व नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याच्यासमवेत सोमवारी (दि.३) फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पाॅवर हाऊसमधून १६३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपात्रात तेजल साळुंखे ही हात-पाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली होती. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमकडून मृतदेहाची शोधमोहीम सुरू होती. अखेर तेजलचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले. हरतळी गावच्या हद्दीमध्ये स्मशानभूमीजवळ तेजलचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक बापू बांगर, फलटण पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. सातारा येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस