वाई : वाई नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह 10 उमेदवार निवडुन आणले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोधसह 12 उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण प्रभाग 9 ब च्या जागेवर नागरीकांचा मागास प्रवर्गचा अपक्ष उमेदवार सुशील खरात विजयी झाला.भाजपाने वाई नगरपालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची बनविली होती. उमेदवारांच्या प्रचारासाठी महसुलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामीन विकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरभी चव्हाण, दिपक ननावरे आदींनी सहभाग घेतला होता.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील हे एकटे खिंड लढवित होते. त्यांना खासदार नितीन पाटील, प्रतापराव पवार आदी सहकार्य करीत होते. शिवसेनेच्या उमेदवारांनसाठी पालकमंत्री व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनीही हजेरी लावली होती परंतू त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. विजयी उमेदवार व समर्थकानी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणेवॉर्ड क्र.१ अ -अपर्णा जमदाडे भाजप- १०६८,वॉर्ड क्र.१ ब प्रसाद बनकर भाजप -११५३,वॉर्ड क्र.अ घनश्याम चक्के राष्ट्रवादी -११३१,वॉर्ड क्र.२ ब पद्मा जाधव भाजप -१४१३,वॉर्ड क्र.३ अ संदीप जावळे राष्ट्रवादी -१२८५,वॉर्ड क्र.३ ब डॉ. जीविता जमदाडे राष्ट्रवादी -१४२२,वॉर्ड क्र.४ अ शारदा काळे राष्ट्रवादी -११६२, वॉर्ड क्र.४ ब संग्राम पवार राष्ट्रवादी -११८५ वॉर्ड क्र.५ अ भारत खामकर राष्ट्रवादी -९५६, वॉर्ड क्र.५ ब ज्योती गांधी भाजप - १०१५, वॉर्ड क्र.६ अ जागृती पोरे भाजप-१०२४,वॉर्ड क्र. ६ ब विजय ढेकाणे भाजप -१०६१, वॉर्ड क्र.७ -अ शैलेंद्र देवकुळे राष्ट्रवादी -९२४,वॉर्ड क्र. ७ ब केतकी मोरे भाजप-९९६ , वॉर्ड क्र.८ अ अजित शिंदे राष्ट्रवादी -९०९, वॉर्ड क्र.८ ब पदमश्री चोरगे राष्ट्रवादी - १३५२, वॉर्ड क्र.९ अ रेखा कांताराम जाधव बिनविरोध -राष्ट्रवादी,वॉर्ड क्र.९ ब सुशील खरात अपक्ष -९४५ , वॉर्ड क्र.१० अ - निलिमा खरात राष्ट्रवादी -९४२, वॉर्ड क्र.१० ब गुरुप्रसाद चव्हाण राष्ट्रवादी -९२८, वॉर्ड क्र.११ अ संग्राम सपकाळ भाजप -१५०३, वॉर्ड क्र.११ ब दीपाली सावंत भाजप -१३९८, वॉर्ड क्र.११ क नूतन मालुसरे भाजप-१४३५ वाईकरांचा परिवर्तनाचा मूड आणि नामदार गाफील मतदार संघात मकरंद पाटील यांची पकड मजबूत असली तरीही वाई शहरातील मताधिक्य कमी प्रमाणात मिळत आलेले आहे. राष्ट्रवादीने नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रमाणात प्रस्तापितांना उमेदवारी दिली असून हि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरली. वाई शहरातील प्रलंबित असणारी विकास कामे पराभवाच्या दिशेने घेवून गेली. तर भाजपने आपली यंत्रणा अतिशय मजबुतपणे राबवून सतर्क राहिल्याने विजयाच्या दिशेने घेवून गेली.
Web Summary : BJP secured a win in Wai, gaining 10 seats, including the mayoral position. NCP won 12. Minister Patil faced a setback despite support. Development issues and BJP's strong strategy led to the results.
Web Summary : वाई में भाजपा ने महापौर पद सहित 10 सीटें जीतीं, NCP को 12 मिलीं। मंत्री पाटिल को समर्थन के बावजूद झटका लगा। विकास के मुद्दे और भाजपा की रणनीति से परिणाम प्रभावित हुए।