शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही 

By नितीन काळेल | Updated: April 20, 2024 19:07 IST

साधू चिकने यांचा आरोप : ..तर पुढील कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा दिला इशारा

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी राष्ट्रवादीस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला आहे. तसेच यापुढेही विश्वासात न घेतल्यास कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात साधू चिकणे यांनी म्हटले आहे की, राज्यात महायुती एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवीत आहे. मात्र, सातारा लोकसभेत येणाऱ्या सातारा आणि जावळी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसला सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्व कोणत्याही गोष्टीत विश्वासात घेत नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना अद्यापही विश्वासात घेण्यात आलेले नाही.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांच्याबाबत स्थानिक मतदारांमध्ये चांगली भावना आहे. असे असताना भाजप नेतृत्वास जावळी तालुक्यात अधिकचे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र, भाजप नेतृत्वाकडून हे होताना दिसून येत नाही. याचा प्रत्यय शेंद्रे येथील महायुतीच्या मेळाव्यातही पाहायला मिळाला. तरीही भाजप नेतृत्वाकडून राष्ट्रवादी सातारा तालुका अध्यक्ष आणि जावळी तालुकाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी कोणताही सुसंवाद केला जात नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याचा फटका महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना बसू शकतो, असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.

पदाधिकाऱ्यांचा यथायोग्य सन्मान राखला जाईलसातारा लोकसभा मतदारसंघात महायुती एकसंघ आहे. नुकताच भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्ज भरला आहे. अर्जांची छाननी झाली असून, आता खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरूवात होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक होईल. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा यथायोग्य सन्मान राखला जाईल. त्याचबरोबर त्यांना जबाबदारीही देण्यात येणार आहे. - धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस