शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:53 IST

महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही

सातारा : सातारा नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपचे अमोल मोहिते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा दारुण पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला. पालिकेत भाजपचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडून आले असून, ९ अपक्ष उमेदवारांनीही विजयाचा गुलाल उधळला. शिंदेसेनेने एका जागेवर विजय मिळवत पालिकेत प्रवेश केला.सातारा नगरपालिकेच्या २५ प्रभागांतील ५० नगरसेवकपदांसाठी यंदा मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सर्व ५० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी, शिंदेसेना व अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत कंबर कसली हाेती.

वाचा: कराडमध्ये भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का; यशवंत, लोकशाही आघाडीची बाजी!

भाजपने यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने महाविकास आघाडी यंदा बाजी पलटवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, ‘महाविकास’चा फॉर्म्युला साताऱ्यात सपशेल फेल ठरला. 

वाचा: फलटणमध्ये रामराजेंच्या तीस वर्षांच्या सत्तेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लावला सुरुंग महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. उलट भाजपने तिकिटात डावललेल्या बंडखोर उमेदवारांनीच भाजपा उमेदवारांचा दारुण पराभव करत आपल्या प्रभागात आपणच ‘धुरंधर’ असल्याचे दाखवून दिले. 

वाचा: मंत्री मकरंद पाटीलांच्या गडाला तडा, वाई नगरपालिकेत भाजपची मुसंडी   या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते विजयी झाले. त्यांच्या पारड्यात ५७ हजार ५८७ मते पडली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना १५ हजार ५५५ मतांवर समाधान मानावे लागते. ५० पैकी ४० जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या. नऊ ठिकाणी अपक्ष तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवाराने विजयाचा गुलाल उळधला. पालिकेत भाजपने मुसंडी घेतली असली तरी अपक्षांचे ‘राजकीय वजन’ मात्र यंदा चांगलेच वाढले. त्यांच्यामुळे भाजपच्या प्रमुख व ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वाचा: सातारा जिल्ह्यात भाजपचा वारू कराड, पाचगणी, महाबळेश्वरला रोखलाप्रभाग तीनमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळलाप्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपने दोन्ही जागा गमावल्या आहेत. येथे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांच्या अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.

अशोक मोने यांच्या ३५ वर्षांच्या सत्तेला ‘ब्रेक’सर्वात मोठा उलटफेर प्रभाग क्रमांक २१ मध्ये पाहायला मिळाला. येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खंदे समर्थक आणि सलग ३५ वर्षे नगरसेवक राहिलेले अशोक मोने यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार सागर पावसे यांनी मोने यांच्या राजकीय प्रवासाला लगाम लावत विजयश्री खेचून आणली.

प्रतिष्ठेच्या लढाईत प्रशांत आहेरराव विजयीप्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपने नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या जागी संतोष पवार यांना मैदानात उतरवले होते. मात्र, भाजपने डावललेले प्रशांत आहेरराव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. या विजयामुळे पालिकेत आहेरराव यांनी दमदार प्रवेश केला आहे.

या अपक्षांनी मारली बाजीप्रभाग आणि उमेदवार१ : शंकर कीर्दत३ : गुरुदेव ऊर्फ मयूर कांबळे, जयश्री जाधव६ : रविराज कीर्दत१३ : सावित्री बडेकर१४ : दिनाज पवार१८ : विनोद फरांदे२० : प्रशांत आहेरराव२१ : सागर पावसे

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Local Elections: BJP wins, Independents shine, Shinde Sena enters.

Web Summary : BJP secured a majority in Satara's municipal elections. Amol Mohite won the mayoral race. Independents also gained ground, while Shinde Sena made its debut. Key upsets included veterans losing to independent candidates.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Satara areaसातारा परिसरBJPभाजपाMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५