शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

By दीपक देशमुख | Updated: January 24, 2024 17:18 IST

शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास 

सातारा : राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून वातावरण गढूळ गेले आहे. त्यामुळे स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले.सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे आल्या होत्या. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, देशात व राज्यात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे खडसे म्हणाल्या.खडसे म्हणाल्या, माझी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा दौरा केला आहे. यादरम्यान महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिक परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिलांमध्ये अंतर्गत वाद नाहीत. मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद नाहीत. पक्षात मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा पक्ष लोकशाहीनुसार चालतो. कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जाते. इतर पक्षांमध्ये दबावतंत्र वापरले जाते, कार्यकर्त्याला बोलू दिले जात नाही, तशी परिस्थिती राष्ट्रवादीत नाही. गेल्या दहा वर्षाची आकडेवारी पाहता भाजपाच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षातून जास्तीत जास्त संधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याबाबत विचारले असता सुनील माने म्हणाले, मी अजित पवार यांच्यासमवेत अनेक वर्षे राजकारण केले आहे. तथापि, मी शरद पवार यांच्या विचारांचा कार्यकर्ता असून शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे.

सायबांना सोडणारा निवडून येत नाहीसध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohini Khadseरोहिणी खडसेBJPभाजपा