शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अत्याचार करणाऱ्या युवकास वीस वर्षांचा कठोर कारावास, कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:44 IST

अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची दिली होती धमकी

कऱ्हाड : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी युवकाला दोषी धरून न्यायालयाने २० वर्षे कठोर कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कऱ्हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली.संगम संभाजी डुबल (वय २८, रा. राजमाची-सदाशिवगड, ता. कऱ्हाड) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी जानेवारी २०२२ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संगम डुबल तिला भेटायला जात होता. तसेच दुचाकीवरून तो तिला विजयनगर येथील एका लॉजवर घेऊन गेला. “तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,” असे म्हणून त्याने तिच्याशी लगट केली. मुलीने नकार दिला असता त्याने स्वत:जवळील अश्लील फोटो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार ब्लॅकमेल करून शिवीगाळ करीत पीडित मुलीवर त्याने अत्याचार केला. अखेर नैराश्यात गेलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आरोपी संगम डुबल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पवार आणि हवालदार व्ही. ए. संदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे कठोर कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पोलिस कॉन्स्टेबल एस. बी. भोसले यांनी सहकार्य केले.

सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले..सरकार पक्षाकडून या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पवार, हवालदार व्ही. ए. संदे यांच्यासह पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी आणि लॉज व्यवस्थापक यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद, साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला गुन्ह्यात दोषी धरले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय