बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:54+5:302021-01-08T06:04:54+5:30

कऱ्हाड : वसंतगड, ता. कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत ...

The terror of leopards | बिबट्याची दहशत

बिबट्याची दहशत

कऱ्हाड : वसंतगड, ता. कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. मात्र, या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

मलकापुरात गर्दी

मलकापूर : येथील मलकापूर फाटा परिसरात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे हा नित्याचा प्रकार बनला आहे. सकाळी दहा व सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

नियमांचे उल्लंघन

कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवरती विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. काही ठिकाणी दुकानातील साहित्यही रस्त्यावर तसेच फुटपाथवर मांडण्यात आल्याचे दिसून येते.

दुभाजकात गवत (फोटो : ०६इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात गवत वाढले आहे. त्यामुळे दुभाजकाचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. गवताबरोबरच दुभाजकात झुडपांचेही साम्राज्य आहे. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर विस्तारल्याने वाहतुकीस धोका निर्माण होत आहे.

Web Title: The terror of leopards