शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

Satara: कऱ्हाडात दोन गटांत राडा, तलवारी नाचवत जमावाकडून दगडफेक; आठ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:41 IST

पोलिसांना न जुमानता युवक एकमेकांना भिडले

कऱ्हाड : शहरातील आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास युवकांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. युवकांनी तलवारी नाचवत दगडफेक केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना न जुमानता युवक एकमेकांना भिडले. या प्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हा दाखल करून, आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.ओमकार उर्फ अहमद सलीम शेख, करण शशिकांत काटरे, प्रज्वल तुळशीनंद कांबळे, अमोल बबन काटरे, हर्ष राकेश कांबळे, आशपाक सलीम शेख, जीवन दुर्योधन कांबळे, आकाश गंगाधर कांबळे (सर्व जण रा.बुधवार पेठ, कऱ्हाड), अमन साजिद शेख, इरफान अश्रफ कच्छी आणि साहिल आलम मुजावर (सर्व रा.मंगळवार पेठ, कऱ्हाड) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये मारामारी सुरू होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पेट्रोलिंग करणारे पोलिस पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी दहा ते पंधरा युवक हातात तलवार घेऊन एकमेकांच्या दिशेने दगडफेक करीत, शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही युवक एकमेकांना मारहाण करीत होते. त्यामुळे अधिक पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. काही वेळातच पोलिस फौजफाटा त्या ठिकाणी पोहोचला. आठ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर युवक पोलिसांना पाहताच तेथून पळून गेले. या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.दुकाने बंद; परिसरात दहशतपालकरवाडा येथे मारामारी व दगडफेक सुरू असताना, मोठी दहशत निर्माण झाली होती. शहरभर अफवा पसरल्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली, तसेच दगडफेकीमुळे नागरिकही दरवाजा बंद करून घरामध्ये बसले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचताच, मारामारी करणारे युवक तेथून पसार झाले. घटनास्थळी सोमवारी दिवसभर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस