अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक ताब्यात

By Admin | Updated: July 7, 2015 22:17 IST2015-07-07T22:17:03+5:302015-07-07T22:17:03+5:30

धडक कारवाई : महसूलचा वॉच ‘आॅन ड्युटी चोवीस तास’; पंचवीस ब्रास वाळू जप्त

Ten trucks carrying illegal sand transport | अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक ताब्यात

अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक ताब्यात

कऱ्हाड : तालुक्यात बेकायदेशीरपणे काही ट्रक वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. कऱ्हाडसह मसूर, पाचवड फाटा, कार्वेगाव, गोळेश्वर, तासवडे बेलवडे, भेदा चौक आदी ठिकाणी अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असलेल्या दहा ट्रकवर वॉच ठेवत त्यांच्यावर कारवाई करून ते ताब्यात घेतले. कारवाई अशा प्रकारे पुढेही सुरू ठेवणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या आदेशाने तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आठ ठिकाणी सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाने आठ मंडल अधिकाऱ्यांसह वीस तलाठी यांच्या पथकाने दहा ट्रकवर कारवाई केली कारवाई करण्यात आलेले ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत.कारवाई करण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसवराज चंद्रप्पा माठगे यांचा ट्रक (केएच२२ बी ९०९५) हा पाचवड फाटा, निवास दत्तू मदने (ट्रक क्र.एमएच०९ बीए९००) हा कार्वेगाव, दीपक निवासराव जाधव (ट्रक क्र. एमएच१० एक्यू ५५५५) हा गोळेश्वर, मुजावर (एमएच५० १०२) हा मसूर येथून तर विष्णू भागवत जायभाय (ट्रक क्र. एमएच१४ इएच ६४६३), बंडोपंत रावू शिंदे (एमएच०९ क्यू६०६१), अंकुश शिवाजी पवार (एमएच५०-१३५७) हे ट्रक तासवडे बेलवडे या ठिकाणाहून तसेच सर्जेराव सदाशिव कुंभार (ट्रक क्र. एमएच०४ सीपी २०१), सचिन महादेव पाटील (एमएच१२ आरए६४१) हे दोन ट्रक भेदा चौक, तसेच रवींद्र शामराव भोसले (ट्रक क्र. एमएच५०-९९०) हा कार्वे चौकी अशा एकूण दहा ट्रक व त्यावरील चालकांवर कारवाई करत ते महसूल अधिकाऱ्यांनी रात्री ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या प्रत्येक ट्रकमध्ये अडीच ब्रास इतकी वाळू भरण्यात आली होती. तसेच एकूण दहा ट्रकमधून २५ ब्रास वाळू ट्रकसह ताब्यात घेण्यात आली असून ट्रकचालकांवर कारवाई करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना महसूल विभागाकडून नोटिसाही देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

यांनी केली कारवाई
पाचवडफाटा या ठिकाणी काले मंडल अधिकारी जे. जी. काळे यांच्यासह दोन तलाठी
कार्वेगाव व गोळेश्वर या ठिकाणी मलकापूर मंडल अधिकारी नागेश निकम व शेणोली मंडल अधिकारी किशोर पाटील यांच्यासह सात तलाठी
मसूर या ठिकाणी मसूर मंडल अधिकारी के. टी. वाघमारे यांच्यासह तीन तलाठी
तासवडे बेलवडे या ठिकाणी उंब्रज मंडल अधिकारी एम. बी. चक्के व इंदोली मंडल अधिकारी यांच्यासह चार तलाठी
भेदा चौक व कार्वे चौकी या ठिकाणी कऱ्हाड मंडल अधिकारी एच. एल. बेस्के व कोळे मंडल अधिकारी आर. आर ढाणे यांच्यासह चार तलाठी


वाहनांतून
२५ ब्रास
वाळू जप्त
महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत दहा ट्रक जप्त केले आहेत. हे ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले असून प्रत्येक ट्रकमध्ये अडीच ब्रास अशी एकूण २५ ब्रास वाळू महसूल विभागाने ताब्यात घेतली आहे.

Web Title: Ten trucks carrying illegal sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.