Ten police officers from Satara transferred outside the district | साताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या
साताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

ठळक मुद्देसाताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्याइतर जिल्ह्यातील दोन अधिकारी सातारा जिल्ह्याला मिळाले

सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर इतर जिल्ह्यातील दोन अधिकारी सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत.

जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात बदली झालेले ठिकाण. सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे ( सोलापूर ग्रामीण), सातारा शहर पोलीस ठाण्याचे श्रीकांत पोरे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची जि. सांगली), नियंत्रण कक्षातील बाळासाहेब भरणे (गडचिरोली), तळबीड पोलीस ठाण्याच्या वैशाली पाटील (गोंदीया), कऱ्हाड शहरच्या पुष्पा किर्दत ( मुंबई शहर), बाळशिराम शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), महेंद्र निंबाळकर ( मुबंई शहर), लोणंद पोलीस ठाण्याचे गिरीष दिघावकर (सीआयडी, पुणे), ज्योतीराम पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाणवीज), दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रवीण पाटील (सोलापूर ग्रामीण) येथे या अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नितीन माने यांची सांगलीहून जिल्हा जातपडताळणी कार्यालय तर मारूती सराटे यांची मुंबई शहरातून सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली.


Web Title: Ten police officers from Satara transferred outside the district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.