शिक्षकांनी उल्लेखनीय कार्यातून प्रेरणा द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:00+5:302021-09-23T04:44:00+5:30
येथील आर. के. भोसले स्वतंत्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’तर्फे दिला जाणारा ‘एक्सलंट ...

शिक्षकांनी उल्लेखनीय कार्यातून प्रेरणा द्यावी!
येथील आर. के. भोसले स्वतंत्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’तर्फे दिला जाणारा ‘एक्सलंट टीचर्स ॲवॉर्ड’ मिळाल्याबद्दल येथील प्रा. डॉ. चंद्रकांत माने यांचा सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. चंद्रकांत माने हे गेल्या ३६ वर्षांपासून पाटणच्या बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये भूगोल शास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. या वेळी माजी नगरसेवक बाबासाहेब भोसले, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आघाडीचे माजी अध्यक्ष सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक जगन्नाथ माने, माजी नगरसेवक विलासराव कुंभार, जयंत बेडेकर, राजेंद्र डुबल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो : २२केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड येथील आर. के. भोसले स्वतंत्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रा. डॉ. चंद्रकांत माने यांचा सत्कार करण्यात आला.