दाढोली घाटातील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST2021-06-19T04:25:57+5:302021-06-19T04:25:57+5:30
चाफळ : चाफळ विभागात बुधवारी झालेल्या पावसाने दाढोली-महाबळवाडी नजीक रस्ता खचून मोरीपूल वाहून गेला आहे. या ठिकाणी सार्वजनिक ...

दाढोली घाटातील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर
चाफळ : चाफळ विभागात बुधवारी झालेल्या पावसाने दाढोली-महाबळवाडी नजीक रस्ता खचून मोरीपूल वाहून गेला आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यतत्परता दाखवत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे.
चाफळ विभागातून दाढोली मार्गे पाटणला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. संपूर्ण घाट रस्ता असणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी वेडीवाकडी वळणे आहेत. यातील महाबळवाडीजवळील भैरकाटा नावाच्या शिवाराजवळील घाट रस्त्याच्या दुसऱ्या वळणावरील रस्ता खचून मोरीपुलासह पाईप वाहून गेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. संपूर्ण घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले काढण्याबरोबरच रस्त्यावरील दरड बाजूला करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी वाहिल्याने रस्ता जागोजागी उखडला गेला आहे. त्याचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे.