शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागावर उपसभापतींचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी संपन्न झाली. या सभेत शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान उपसभापती रमेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धारेवर ...

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी संपन्न झाली. या सभेत शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान उपसभापती रमेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिक्षकांच्या उपस्थितीच्या मुद्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापाती प्रणव ताटे होते.

उपसभापती देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये शिक्षण विभागाने लक्ष घालून सुधारणा करावी तसेच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनीही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल माहिती द्यावी, अशाही सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यावेळी सदस्य सुहास बोराटे यांनी स्वाईन फ्लूच्या परिस्थितीबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे माहिती विचारली. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुंढेगावकर म्हणाले, तालुक्यात सध्यातरी स्वाईन फ्लूची कोणतीही लक्षणे निदर्शनास आलेली नाहीत. तसेच तालुक्यातील सर्व पोल्ट्री चालक, चिकन विक्रेत्यांना स्वाईन फ्लूबाबत आवश्यक त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असून तशी लक्षणे सापडल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्याचे डॉ. मुंढेगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या किती योजनांचा लाभ सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थिंना मिळाला, अशी विचारणा डॉ. मुंढेगावकर यांना सदस्यांनी केली. तसेच सदस्यांनी शिफारस करूनही थेट लाभार्थिंना जास्त लाभ मिळत नसेल तर शिफारस करुन काय उपयोग? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर डॉ. मुंढेगावकर म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांबाबत पंचायत समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार केला जाणार आहे. याबाबत सभापती, उपसभापती यांनाही माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- चौकट

अधिकारी, सदस्यांचीही सभेकडे पाठ

कऱ्हाड पंचायत समितीची सभा कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच सभागृहात पार पडली. गत नऊ महिन्यांपासून सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, शुक्रवारची सभा समिती सभागृहात आयोजित केली होती. या सभेला विविध विभागाचे अधिकारी व सदस्यांनीही दांडी मारली. ठरावीकच अधिकारी आणि सदस्य सभेला उपस्थित होते.

- चौकट

पंधरा दिवसांत लस अपेक्षित

कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा डॉ. कुऱ्हाडे यांनी दिला. कोरोना लस देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. शुक्रवारी रंगीत तालीम झाली. पुढील पंधरा दिवसांत लस येणे अपेक्षित आहे. प्रथम आरोग्य विभागाशी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. याचे परिणाम कसे येतात, हे पाहिले जाईल. ही लस पूर्णपणे मोफत देण्यात येईल, असेही डॉ. कुऱ्हाडे यांनी सभेत सांगितले.