तरडगावला ज्वारी भुईसपाट

By Admin | Updated: December 16, 2014 00:17 IST2014-12-15T21:05:10+5:302014-12-16T00:17:20+5:30

शेतकरी हवालदिल : पावसाने केले नुकसान

Taradgawa jowar groundnut | तरडगावला ज्वारी भुईसपाट

तरडगावला ज्वारी भुईसपाट

तरडगाव : शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात तरडगाव, ता. फलटण परिसरातील बऱ्याच ठिकाणी ज्वारीचे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तरडगावसह परिसरातील पाडेगाव, कुसूर, माळेवाडी, शिंदेमाळ आदी भागांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे उभी असलेली बहुतांश ज्वारीची पिके भुईसपाट झाली आहेत. हा पाऊस माळरानावरील व मागास पिकास उपयुक्त ठरत असला तरी मात्र हातातोंडाला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे मका पीक देखील काही ठिकाणी पडलेली आहेत. अवकाळी पावसाबरोबर हवामानातील सततच्या बदलामुळे कांदा, डाळिंब व गहू पिकास फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेल्या ज्वारी पिकासह इतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत
आहे. (वार्ताहर)

शेतकरी संकटात
एका मागून एक येणाऱ्या आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हिरवेगार झालेले शेत पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: Taradgawa jowar groundnut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.