शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मॅग्नेट ते दगडावरून चालणं -ट्रिटमेंटपाथचा लळा । आयुर्वेदिक गार्डनचे सातारकरांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:07 AM

घरातून बाहेर पडताच गाडीला किक मारायची... तेथून आॅफिस अन् पुन्हा गाडीवरून घरी यायचं... आधुनिकतेमुळे व्यायाम कमी झाला, अन् आजारी पडल्यावर लाखो रुपये खर्च करत राहतो. यावरच मात करण्यासाठी सातारा पालिकेने गोडोलीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारले आहे.

जगदीश कोष्टी ।सातारा : घरातून बाहेर पडताच गाडीला किक मारायची... तेथून आॅफिस अन् पुन्हा गाडीवरून घरी यायचं... आधुनिकतेमुळे व्यायाम कमी झाला, अन् आजारी पडल्यावर लाखो रुपये खर्च करत राहतो. यावरच मात करण्यासाठी सातारा पालिकेने गोडोलीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारले आहे. त्यातील ट्रिटमेंट पाथचा हजारो सातारकर दररोज वापर करत आहेत.

पंजाबमधील सुनाम शहरातील हौसिंग गार्डनपासून प्रेरणा घेऊन साडेतीन एकर जागेत नावीन्यपूर्ण आयुर्वेदिक गार्डन तयार केले आहे. या ठिकाणी २३५ मीटर लांबीचा चालण्यासाठी पेव्हर पाथ-वे बनविला आहे. यावरून असंख्य मंडळी चालत असतात.

याशिवाय या गार्डनमध्ये विविध व्याधींचे निवारण करणारे आठ ट्रिटमेंट पाथ-वे बनवले आहेत. याचं सध्या सर्वांना आकर्षण आहे. सर्वात प्रथम मॅग्नेटिक पाथ लागतो. मॅटलाच उच्च शक्तीचे मॅग्नेट बसविले आहते. शरीर जैव विद्युत तरंगांच्या माध्यमातून कार्य करते.

ग्रास पाथवरील हिरवळीवर चालल्याने चेता संस्था सक्रिय होते. आॅप्टिक नर्व्ह क्रियाशील होऊन दृष्टी सुधारते. रक्तदाब कमी होऊन तणावमुक्त ठेवण्यास मदत करतो. पुढे अ‍ॅक्युप्रेशर पाथमध्ये खडीवरून चालल्याने शरीरातील १०८ ऊर्जा बिंदूवर दाब पडून ते क्रियाशील होतात. गुडघेदुखी, कंबरदुखींपासून सुटका होऊन स्थूलता कमी होते, असे शास्त्र सांगते. दगडधोंड्यातून लहान मुलं अनवाणी सहज चालतात; पण मोठ्यांना सवय नसल्यानं हा पथ कधी संपतो, असे वाटते. सँड पाथ समुद्री वाळूच्या कणांपासून तयार करण्यात आला असून, या वाळूत रेडियम असते. त्यावर चालण्याने शरीरातील विषारी द्र्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया जलद होते.लहान मुलांना प्रवेश बंदी...या ट्रॅकवरून चालण्याने शरीरातील अनेक इंद्रिये सक्रिय होतात. त्यामुळे या ट्रॅकवरून केवळ चौदा वर्षांवरील व्यक्तींनाच सोडले जाते. ही बाग सकाळी व सायंकाळी उघडी असते. त्यामुळे दररोज सरासरी दीड ते दोन हजार सातारकर वापर करत आहेत. एकदा गेल्यावर चांगला अनुभव येत असल्याने गेल्या उन्हाळी सुटीत ही बाग चांगलीच फुललेली पाहायला मिळाली.केवळ चालण्याने व्याधी दूरक्रिस्टल पाथमुळे सकारात्मक ऊर्जा शोषली जाऊन आराम मिळतो. हायड्रो पाथमुळे शारीरिक व मानसिक ताण दूर होऊन स्फूर्ती मिळते. अ‍ॅरोमा पाथमुळे सकारात्मकता निर्माण होऊन उत्साह संचारतो. मन ताजेतवाणे व आनंदी राहते. मड पाथमुळे शरीरातील संपूर्ण विष शोषून मानसिक शीतलतेचा अनुभव येतो. यामुळे मनही शांत होत असल्याचा अनुभव येतो. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर