शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बगाड यात्रेत घुमला ‘चांगभलं’चा जयघोष

By admin | Updated: April 10, 2015 01:04 IST

कवठेत भक्तांची मांदियाळी : घुमला चांगभलंचा जयघोष : राजेंद्र पोळ यांना मिळाला बगाड्याचा मान

कवठे : कवठे, ता. वाई येथील बगाड यात्रा दि. ९ व १० रोजी साजरी होत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. गावाच्या शिवारातून निघालेल्या बगाडयात्रेत ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं, भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष घुमला.यात्रेच्या आदल्या रात्री वाजता भैरवनाथ मंदिरात बगाडासाठी कौल लावण्यात आला. राजेंद्र पोळ यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण करून पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे शंकरराव पोळ यांच्या भावकीतील बैलामार्फत पोहोचविण्यात आला. दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. काशिनाथाचे चांगभले, भैरवनाथाचे चांगभले, या जयघोषात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले. ठरावीक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येत होत्या. यामुळे अरिष्ट टळते, असे मानले जाते. सायंकाळी सहाच्या दरम्यान बगाड यात्रा कवठे गावात येऊन निर्विघ्न पार पडली. खांद्यावरून बगाड्यास भैरवनाथ मंदिरात नेवून त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.रात्री छबिन्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनासाठी तमाशाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा होणार असून यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संतोष पडळकर व धीरज पवार यांची ५१ हजार रुपये व चांदीच्या गदा यावर कुस्ती होणार असून विविध चार लाखांपर्यंत इनामांच्या जंगी फडाचे आयोजन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर) ५रथाला सहा बैलजोड्याकवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून या अकरा भावकीच्या बैलांना ठरावीक अंतर बगाड ओढण्याचा मान दिला जातो. यास खुता असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो.