शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:45 IST

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सातारा : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार इतका प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे घोषित केले. शेतकऱ्यांनी उसनवारी करून कर्जाच्या रकमा भरल्या; परंतु अद्याप त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तसेच साखर कारखान्यांनी ऊस घेतल्यानंतर एफ आर पी च्या रकमा थकवलेल्या आहेत.हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी होऊन पिकांची पेरणी लागवड केली; परंतु सातारा जिल्ह्यामध्ये पाऊसच न पडल्यामुळे पेरणी वाया जाऊन पिकाचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस नसल्यामुळे शासनाने सातारा जिल्'ात अति तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य अर्जुनराव साळुंखे, देवानंद पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार, दादासाहेब यादव, तानाजी देशमुख, रमेश पिसाळ, नितीन यादव, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, संजय कांबळे, विजय चव्हाण, रामचंद्र मोरे, दत्ता पाटील, महादेव डोंगरे आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर