धावडशीच्या शाळेतून उत्तरपत्रिकांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:54 IST2018-04-29T11:54:23+5:302018-04-29T11:54:23+5:30
सातारा तालुक्यातील धावडशी येथील ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूलमधून सातवीतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाची चोरी झाली आहे. याबाबत माहिती अशी की, धावडशी येथील ब्रह्मेंंद्रस्वामी हायस्कूलच्या पुरुष शिक्षकांच्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका ठेवल्या होत्या.

धावडशीच्या शाळेतून उत्तरपत्रिकांची चोरी
सातारा : सातारा तालुक्यातील धावडशी येथील ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूलमधून सातवीतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाची चोरी झाली आहे. याबाबत माहिती अशी की, धावडशी येथील ब्रह्मेंंद्रस्वामी हायस्कूलच्या पुरुष शिक्षकांच्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका ठेवल्या होत्या. त्यामध्ये सातवीच्या विज्ञान विषयाच्या उत्तरपत्रिका होत्या. त्यातील ३९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अज्ञाताने लंपास केल्या. याबाबत हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय विष्णू सूर्यवंशी यांनी तक्रार दिली असून, सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राजू मुलाणी करीत आहेत.