सुरूची राडा प्रकरण : आमदार शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 16:48 IST2017-11-22T16:47:17+5:302017-11-22T16:48:29+5:30
'सुरूची राडा'प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या सात कार्यकर्त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सुरूची राडा प्रकरण : आमदार शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन
सातारा : 'सुरूची राडा'प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या सात कार्यकर्त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजू भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार, फिरोज पठाण अन् माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्यासह सात जणांचा अटकपूर्व जामीन सातारा येथील न्यायालयात फेटाळला गेला होता . त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात आरोपींचा कोणताही रोल नसल्याचे स्पष्ट केले. आरोपींचे वकील अॅड. शिरीष गुप्ते यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने या सात जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.