शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे-पाटील यांनी माझ्यावरचा राग शांतिदूतवर काढला, सुरेश खोपडे यांचा सनसनाटी आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:19 IST

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देनिवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप प्रशासनाने संयुक्त कारण द्यावे, अन्यथा त्याच ठिकाणी पुतळा बसवावापुतळा हटवण्यात जनतेचे हित नसून नांगरे-पाटील यांचा अहंकार

सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, शांतिदूत हटवण्यासाठी पोलिसांना दोन वेळा घुमजाव करणे, म्हणजे प्रशासकीय बाब असूच शकत नाही. प्रशासकीय बाब म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय होय. पुतळा हटवण्यात जनतेचे हित नसून नांगरे-पाटील यांचा अहंकार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शांतिदूत हटवण्याचे संयुक्तिक कारण द्यावे, अन्यथा त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी केली.सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील असलेला शांतिदूत पुतळा गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी हटविला. या पार्श्वभूमीवर सुरेश खोपडे यांनी सोमवारी साताऱ्यांत येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, विजय मांडके उपस्थित होते.खोपडे म्हणाले, मुख्यालयासमोर पूर्वी चार तोफा होत्या. त्या पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात दडपण येत होते. त्यामुळे मुख्यालयात येण्यासाठी लोकांना भीती वाटत होती. ही परिस्थिती बदलून पोलीस कल्याण निधी आणि कार्यालयीन खर्चातून रिकाम्या पुंगळ्या वितळवून शांतिदूत पुतळा उभारण्यात आला होता.

हे सामान्य आणि पीडित लोकांच्या रक्षणाचे प्रतीक होते. मी सातत्याने प्रशासनातील बदलावर बोलत असल्याने नोकरशाहीला असे बदल नको आहेत. त्यामुळे मला आणि मी मांडत असलेला परिवर्तनाचा विचार दाबण्यासाठी अशी प्रतिके हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस