शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:49 IST

कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.

सातारा : सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना एक भेटवस्तू मिळणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हाणला. दरम्यान, निवडणुकीसाठी राज्याचे प्रकल्प गुजरातला पळवले. चार लाख लोकांचा रोजगार गेला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राच्या सांगण्यावरून गप्प बसल्याची टीकाही त्यांनी केली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यामुळेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले. इथल्या चार लाख लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्राने बोलू नका, असे सांगितल्यानेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री काही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आलीय, आता आमचे प्रकल्प आम्हाला परत द्यावेत. निवडणुकीमुळेच कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत.सध्याच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना आहे. योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.रोहित पवारांच्या विधानाची नितेश राणेंनी खिल्ली उडवत शक्ती कायदा झाला तर राष्ट्रवादीचेच तीन आमदार तुरुंगात जातील, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता जयंत पाटलांनी त्यांच्या प्रत्येक विधानावर उत्तर द्यायची गरज नसल्याचे सांगत बगल दिली.सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात सरकारने दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नाताळच्या सुट्याही येत आहेत. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात आहे; परंतु जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडता आले पाहिजेत. यामुळे तीन आठवडे अधिवेशन सुरू राहण्यासाठी आग्रही असल्याचे पाटील यांनी सांगितले.सदावर्ते भाजपचे हस्तक गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. जे सत्ताधाऱ्यांना बोलता येत नाही, ते सदावर्ते यांच्या मार्फत बोलले जाते. सत्ताधारी त्यांचा वापर खुबीने कसा करतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तथापि, खासदार उदयनराजे भोसले यांचा सध्या संपर्क नसल्याचे सांगत ते राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत का नाहीत, यावर त्यांनी अधिक भाष्य टाळले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे