कऱ्हाडनजीक दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या

By Admin | Updated: March 14, 2017 14:11 IST2017-03-14T14:11:12+5:302017-03-14T14:11:12+5:30

पती बचावला : एका मुलाचा मृतदेह आढळला; पत्नीसह दोन मुले बेपत्ता

Suicide with three young girls in Karabandh | कऱ्हाडनजीक दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या

कऱ्हाडनजीक दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या

दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या

पती बचावला : एका मुलाचा मृतदेह आढळला; पत्नीसह दोन मुले बेपत्ता

आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (सातारा) : कर्जाला कंटाळून दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह मंगळवारी पहाटे कोयना नदीपात्रात उडी घेतली. त्यापैकी पती सुरक्षितरीत्या नदीपात्रातून बाहेर पडला. मात्र, पत्नीसह तीन मुले बुडाली असून, मंगळवारी दुपारी एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. पत्नीसह इतर दोन मुलांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.
मलकापुरातील बैलबाजार रोडलगत राहणाऱ्या अमोल हणमंत भोंगाळे (वय २८) व मिनाक्षी (२३) या दाम्पत्याने हर्ष (साडेतीन वर्ष), श्रवण (दीड वर्ष) व चार महिन्यांच्या मुलीसह नदीपात्रात उडी घेतली होती. रविवारी पहाटे हे दाम्पत्य दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यानजीकच्या नवीन कोयना पुलावर आले. पुलावरून त्यांनी आपल्या तीन चिमुरड्यांसह नदीपात्रात उडी घेतली. मात्र, काही वेळानंतर पती अमोल नदीपात्रातून सुरक्षितरीत्या बाहेर पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अमोलला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. तर इतरांचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाच्या श्रवणचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मिनाक्षी, हर्ष व चार महिन्यांच्या मुलीचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.

Web Title: Suicide with three young girls in Karabandh