शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वाईत पोलिसाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला दिग्विजय पोळ याची पत्नी सुप्रिया पोळ (वय २७, रा. कवठे, ता. वाई) हिने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी हवालदार दिग्विजय पोळला अटक केली असून, त्याला न्यायालयाने तीन दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला दिग्विजय पोळ याची पत्नी सुप्रिया पोळ (वय २७, रा. कवठे, ता. वाई) हिने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी हवालदार दिग्विजय पोळला अटक केली असून, त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रियाचा विवाह कवठे, ता.वाई येथील दिग्विजय पोळ याच्याबरोबर दि. २२ मे २०१४ रोजी झाला होता. सुप्रियाचे शिक्षण बीएस्सी बीएडपर्यंत झाले होते. तसेच तिला पाच महिन्यांचा मुलगा आहे. तर सुप्रियाचा पती दिग्विजय पोळ हा सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तिचा गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता.दरम्यान, सोमवार, दि. ४ रोजी रात्री पावणे दहा वाजता सुप्रियाच्या आईला फोन करून सुप्रिया चक्कर येऊन जिन्यावरून पडली असून, तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले असल्याचे खोटे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहिले असता सुप्रिया मयत झाल्याचे समजले. सुप्रियाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दवाखान्यातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर त्यांना सांगितले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात अत्यसंस्कार केले.माहेरहून पैसे आणण्यासाठी छळलग्नानंतर पती व सासरच्या लोकांनी सुप्रियाला दोनच महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर चारचाकी गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी सुप्रियाचा सतत छळ केला जात होता. सुप्रियाच्या माहेरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने प्रत्येकवेळी आई सुप्रियाची समजूत काढून तिला सासरी नांदण्यासाठी पाठवत असे. तसेच पती दारू पिऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करीत होता.पती सासूविरोधात गुन्हायाप्रकरणी पती दिग्विजय पोळ, सासू विजया नामदेव पोळ, दीर जयदीप नामदेव पोळ व चुलत सासरे किसन आनंदराव पोळ यांच्यावर भुर्इंज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.