महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:04 IST2020-06-20T10:04:01+5:302020-06-20T10:04:47+5:30

सातारा येथील विलासपूरात राहणाऱ्या शीतल सुरेंद्र यादव (वय २३) या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

Suicide by strangulation of a woman | महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देमहिलेची गळफास घेऊन आत्महत्याआत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात

सातारा : येथील विलासपूरात राहणाऱ्या शीतल सुरेंद्र यादव (वय २३) या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शीतल यादव ही महिला तिच्या कुटुंबीयासमवेत विलासपूर येथे राहण्यास आहे. तिने शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप पोलिसांनाही समजले नसून, पोलीस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. शहर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

Web Title: Suicide by strangulation of a woman