खटाव तालुक्यात दोघांची आत्महत्या

By Admin | Updated: February 7, 2016 00:55 IST2016-02-07T00:55:13+5:302016-02-07T00:55:13+5:30

एक युवक आणि एका महिलेचा समावेश

Suicide in Khatav Taluka | खटाव तालुक्यात दोघांची आत्महत्या

खटाव तालुक्यात दोघांची आत्महत्या

वडूज : खटाव तालुक्यातील वडूज व अंबवडे येथे दोघांनी आत्महत्या केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून, यामध्ये एक युवक आणि एका महिलेचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. ५ रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास वडूज येथील शिक्षक बॅँकेसमोरील घरात वास्तव्यास असणारा प्रणव पांडुरंग पवार (वय २१ ) याने गळफास घेतला असल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्याला तत्काळ खासगी रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अंबवडे येथे शनिवार, दि. ६ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास आंब्याचा मळा नावच्या शिवारात शोभा पाटोळे (वय ३५) या महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाटोळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास पोलीस हवालदार भोईटे व शांताराम ओंबासे करीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Suicide in Khatav Taluka