तुपेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:49 IST2021-04-30T04:49:54+5:302021-04-30T04:49:54+5:30
वडूज : तुपेवाडी (ता. खटाव ) येथील दादा बाबूराव काळे (४०) यांनी इनाम नावाच्या शिवारात गळफास घेऊन ...

तुपेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या
वडूज : तुपेवाडी (ता. खटाव ) येथील दादा बाबूराव काळे (४०) यांनी इनाम नावाच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दादा काळे हे आपल्या कुटुंबासमवेत तुपेवाडी येथे एकत्रित राहत होते. बुधवार, दि. २८ रोजी ‘धान्य आणण्यासाठी जातो,’ असे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. गुरुवार दि. २९ रोजी सायंकाळी इनाम नावाच्या शिवारात पिंपरणीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
दादा काळे यांचे भाऊ सतीश काळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक विपुल भोसले तपास करीत आहेत.