पाच मित्रांच्या विरहाने आत्महत्या

By Admin | Updated: July 29, 2016 00:27 IST2016-07-28T23:52:08+5:302016-07-29T00:27:57+5:30

खंबाटकी घाटाजवळ विषप्राशन : आठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी झाला होता अपघाती मृत्यू

Suicide with five friends | पाच मित्रांच्या विरहाने आत्महत्या

पाच मित्रांच्या विरहाने आत्महत्या

शिरवळ : ‘ही दोस्ती तुटायची नाय...,’ हे चित्रपटातील गाणं नेहमीच आळवण्यात येते. आताही तसेच कारण घडले आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी आजारी मुलाला पाहण्यासाठी दवाखान्यात येत असताना झालेल्या अपघातात पाच जिवलग मित्रांचा अंत झाला होता. हा मृत्यू वारंवार मृत्यूची आठवण करून देत असल्याने चक्क सहाव्या कामगार मित्राने मित्रांच्या आठवणीत चक्क त्याच अपघातस्थळीच विषप्राशन करत आत्महत्या केली.
ही हृदयद्रावक घटना घडली आहे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्याजवळ असणाऱ्या वीसभिगा शिवाराजवळ. वसंत महादेव शिंदे ( वय ४६, सध्या रा. पेटकर कॉलनी, रविवार पेठ वाई. मूळ रा. कार्वे, ता. वाळवा, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी जात असताना वाहन पलटी होऊन त्यांचे मित्र ठार झाले होते.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथील वसंत महादेव शिंदे हे वाई येथील एका खासगी कंपनीत कामास होते. दरम्यान, वसंत शिंदे हे खंडाळा येथील वीसभिगा नावाच्या शिवारात थायमॅट हे विषारी औषध प्राशन केल्याने मृतावस्थेत आढळून आले.
यावेळी वसंत शिंदे यांच्या खिशात कंपनीच्या मिळालेल्या आयकार्डवरून त्यांची ओळख पटली. याबाबत खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, हवालदार नितीन नलावडे यांनी वाई पोलिस निरीक्षक वेताळ यांच्याशी संपर्क साधत याबाबतची कल्पना दिली.
वेताळ यांनी वाई येथील कंपनीमधील एका कामगाराबरोबर संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. यावेळी तत्काळ आत्महत्या केलेल्या वसंत शिंदे यांच्या बंधूंनी
व सासऱ्यांनी धाव घेत याबाबतची माहिती खंडाळा पोलिसांना देताच हृदयद्रावक घटना उघडकीस
आली.
खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची नोंद आकस्मित मयत खंडाळा पोलिस स्टेशनला झाली आहे. हवालदार नितीन नलावडे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)


शिंदे यांचे घटनास्थळी वारंवार जाणे....
जगात ‘मैत्री’ हे सर्वश्रेष्ठ नाते मानले जाते. मैत्रीसाठी जीव दिलाही जातो आणि जीव घेतलाही जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पुणे याठिकाणी आपल्या जिवलग मित्राच्या आजारी मुलाला पाहण्यासाठी निघालेले इतर जिवलग पाच मित्रांचा खंबाटकी घाटाजवळ दुभाजकाला वाहन धडकून करून अंत झाला होता. याचा धसका सहावा मित्र वसंत शिंदे यांनी घेतला होता. गेली सात ते आठ वर्षे वसंत शिंदे हे संबंधित घटनास्थळी दर दोन-तीन दिवसांतून येऊन ढसाढसा रडत होते. आता या जिवलग मित्राने आत्महत्या केली.

Web Title: Suicide with five friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.