सोमंथळी येथे कोरोनाबाधिताची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:44+5:302021-05-03T04:33:44+5:30
सातारा : फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील एका ५६ वर्षीय कोरोनाबाधिताने कोरोना आजाराची भीती मनात बाळगून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

सोमंथळी येथे कोरोनाबाधिताची आत्महत्या
सातारा : फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील एका ५६ वर्षीय कोरोनाबाधिताने कोरोना आजाराची भीती मनात बाळगून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सोमंथळी येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी या आजाराची भीती मनात बाळगल्यामुळे ते निराश झाले होते. याच नैराश्यातून त्यांनी सोमंथळी येथे शेताच्या तालीवर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा हा प्रकार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्यापूर्वी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक ए.एस. कर्णे हे करत आहेत.