शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: ट्रॅक्टरच्या धडकेत ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:59 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील शेतकरी लक्ष्मण दशरथ संपकाळ यांच्या गोल नावाच्या शिवारातील शेतामध्ये उसाच्या ट्रॅक्टरची धडक बदल्याने ...

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील शेतकरी लक्ष्मण दशरथ संपकाळ यांच्या गोल नावाच्या शिवारातील शेतामध्ये उसाच्या ट्रॅक्टरची धडक बदल्याने ऊसतोड मजुराच्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सागर शिवाजी राठोड (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संकेत कृष्णा जाधव असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, अल्हनवाडी येथील ऊस तोडणी कामगार कृष्णा बबन जाधव हे पत्नी समवेत गुरुवारी ऊस तोडणीचे काम करत होते. दुपारी तीन वाजता भाऊसाहेब विरंगळे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन चालक सागर शिवाजी राठोड हा साखर कारखान्याकडे ऊस भरून निघाला होता. शेतातून रस्त्यावर ट्रॅक्टर नेत असताना डाव्या चाकाची धडक बसून संकेत जाधव हा मुलगा गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने कोरेगावातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी कृष्णा बबन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सागर शिवाजी राठोड याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक राऊत तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगावAccidentअपघातDeathमृत्यू