शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर कारखानदारांचा दरोडा, ‘स्वाभिमानी’चा आरोप 

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 18:49 IST

गावोगावी बैठका घेऊन हिशोब चुकता करण्याचा इशाराही

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन वर्षांपासून रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत गावोगावी बैठक घेऊन कारखानदारांचा हिशाेब चुकता करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राजू शेळके यांनी म्हटले आहे की, साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच इथेनॉलसह इतर उपपदार्थांची निर्मिती करून रिकव्हरीत जाणून बुजून घट दाखवायची अन् आम्ही एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याचे मिरवायचे, असे प्रकारही कारखानदारांनी सुरू केले आहेत. त्याचबरोबर उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थांचे पैसेही कारखानदार गडप करू लागलेत. हे कारखानदार उपपदार्थांचे उत्पादन वाढवतात आणि साखरेचे थोडेसे कमी करतात. यामुळे कारखान्याची रिकव्हरी कमी होते. त्यामुळे साहजिकच रिकव्हरीवर आधारित एफआरपीही कमी होत आहे. अशा पध्दतीने शेतकर्यांना लुटण्याचा नवा मार्ग कारखानदारांनी शोधला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कंगाल होऊ लागला आहे. कारखानदार मात्र, शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मालामाल होत चाललेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाम गाळून, कर्ज काढून, प्रचंड कष्ट व मेहनत करून ऊस पिकवलेला असतो. या उसाच्या बिलातून त्याला कर्ज फेडायचे असते. इतर खर्च भागवायचे असतात. मात्र, त्याच्या घामाच्या दामाला योग्य भावच कारखानदार देत नाही. तसेच त्यांची विविध पध्दतीने लूट केली जात आहे.साखर कारखानदार रिकव्हरी कमी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम करू लागले आहेत. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जागृती करून शेतकऱ्यांना संघटीत केले जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका, सभा घेऊन आगामी काळात कारखानदारांचा सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर दरोडा टाकत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांत जागृती करुन याचा हिशोब कारखानदारांकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात सगळे हिशोब चुकते केल्याशिवायही शांत बसणार नाही. हे कारखानदारांनी व शासनानेनीही लक्षात घेण्याची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी