शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक!, आळंदी-पंढरपूर मार्गावर चार वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:25 IST

मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू

जिंती : फलटण येथील आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. लि., पुणे कडून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवून परवानगी न घेता गौणखनिज वाहतूक करणाऱ्या १५ ब्रास माती व मुरूम वाहणाऱ्या ४ वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही केली आहे.याबाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरून महसूल विभागाने फलटण-आसू रोड आसू पाटी धुळदेवजवळ विनापरवाना माती व मुरूम वाहणारे १५ ते २० वाहने जात असताना, त्यातील ४ गाड्या महसूल विभागाने पकडल्या असून, वाहनचालकाकडे गौण खनिज वाहतूक परवाना आल्याबाबत विचारणा केली असता, तो आढळून न आल्याने संबंधित ४ गाड्या धुळदेव तलाठी अभिजित मोरे, धुळदेव पोलिसपाटील पवन आडके यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालय, फलटण येथे आणून जमा केल्या. संबंधित वाहनाचा पंचनामा केला असता, ५ ब्रास माती व १० ब्रास मुरुम त्यामध्ये आढळून आला. तसेच विनापरवाना मुरूम वाहतूक करणारी ३ वाहने तलाठी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमोरून पळून गेली. संबंधित वाहने आर. के. चव्हाण इन्फा प्रा. लि., पुणे यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.फलटण तालुक्यातील ज्या गावातून मुरूम व माती उपशाची शेतजमिनीची त्रयस्थ विभागांकडून चौकशी करण्याची आवश्यकता असून, उपसा करण्यात आलेल्या शेतजमिनीचा पंचनामा व मोजमाप करण्याची गरज असून, या तपासात बुडालेला कोट्यवधीचा महसूल उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू.....फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक, बरड, सस्तेवाडी, नाईकबोमवाडी, भवानीनगर, राजुरी, विडणी, तरडगाव, काळज, धुळदेव, वडले, मिरढे व इतर गावांत महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानीशिवाय अनेक महिन्यांपासून लाखो ब्रासचा मुरूम व मातीचा उपसा सुरू असून, दिवसरात्र हजारो हायवाच्या माध्यमातून केंद्राचे पालखी महामार्गाचे काम आहे, असा दम देऊन काही परिपत्रके व आदेश दाखवून कोटीचा राज्य शासनाचा महसूल बुडवून मुरूम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळू