शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांसाठी सज्ज राहावे, मंत्री उदय सामंतांचे आवाहन; उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:00 IST

शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज

कऱ्हाड : ‘कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू करीत आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत; पण त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयात सोमवारी मंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मंत्री सामंत म्हणाले, ‘शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनचा नाईलाजाने आधार घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीदेखील स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊ शकतात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर राहू नयेत म्हणून लसीकरणाचे शिबिर महाविद्यालयात राबवण्यात येणार आहेत, असेही मंत्री सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राचार्यांना खर्च करताना मर्यादा होत्या. त्या मर्यादाही वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तो निर्णय राज्यभरासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.तक्रार आली, तर कारवाई करणार...तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. याकडे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, तशा प्रकारची पुराव्यासह लेखी तक्रार माझ्याकडे कोणी दिली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.कऱ्हाड महाविद्यालयासाठी अनेक निर्णय..- मंत्री सामंत यांनी कऱ्हाड येथील शासकीय महाविद्यालयांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी जाहीर केले. ते पुढीलप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सुरू करणार- कऱ्हाड येथे इनोवेशन सेंटर उभारण्यासाठी मागणी होत आहे. त्याचा ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आला आहे. त्याला तातडीने मंजुरी देऊन ५ कोटींचा निधी देणार- शासकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व शिपाई यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे १ एप्रिलपासून पगार देण्यात येणार- मागासवर्गीय समाजातील मुलींच्या वसतिगृहासाठी ९ कोटींचा निधी देणार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollegeमहाविद्यालयUday Samantउदय सामंतexamपरीक्षाStudentविद्यार्थी