शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

‘एसईएमएसच्या विद्यार्थ्यांनी जप्त केलं घरातलं प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:07 IST

कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाºया काळ्या रंगाच्या पातळ पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत. या पिशव्या हल्ली दुकानातच नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे सर्रास मिळतात. कारवाईच्या धाकाने पिशव्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले.

ठळक मुद्देलोकमत विशेष...घरातूनच नव्हे तर आता मनातूनही बाहेर काढण्याचा संकल्पविद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी प्लास्टिक विरोधी उपक्रम हाती घेतला.

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पर्यावरण तसेच माणसं, जनावरांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना केवळ घरातूनच नव्हे तर मनातून बाहेर काढण्याचा चंग सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला आहे. त्याचा एक कृतिशील भाग म्हणून हे विद्यार्थी आपल्या घरात आढळणाºया प्लास्टिक पिशव्या जप्त करून शाळेत एकत्र गोळा करतात. नंतर हे प्लास्टिक रिसायकलसाठी देण्यात येणार आहे. प्लास्टिक विरोधी विचार विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजविण्याच्या शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणाम दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी बºयाच घोषणा झाल्या. वापरून झालेल्या दुधाच्या पिशव्या पुन्हा दुकानदाराला परत दिल्यास अमूक पैशांचा परतावा, दुधाच्या पिशव्यांना काचेच्या बाटलीचा पर्याय, किराणा मालाच्या दुकानदारांची अडचण दूर करण्यासाठी नियमात दिलेली सूट असे अनेक प्रकार दोन वर्षांत पाहायला मिळाले; पण यातून काहीही निष्पन्न झाले नाही. लोक सुरुवातीला घरातून कापडी पिशव्या घेऊन जायचे; पण थोड्याच दिवसांत दुकानदारच प्लास्टिक पिशव्यांमधून माल देऊ लागले.

कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणा-या काळ्या रंगाच्या पातळ पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत. या पिशव्या हल्ली दुकानातच नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे सर्रास मिळतात. कारवाईच्या धाकाने पिशव्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. सुरुवातीच्या कारवाईचा उत्साह आटला असून, फूटपाथवरील फेरीवाल्यापासून दुकानांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर पाहायला मिळतो. लोकही त्याच पिशव्या वापरू लागले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी प्लास्टिक विरोधी उपक्रम हाती घेतला. यामध्ये इयत्ता पाचवी ते नववीमधील सुमारे सव्वाचारशे विद्यार्थी सहभागी झाले. मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी नुकतेच प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर या उपक्रमाला स्कूलमध्ये सुरुवात झाली.

प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदूषण तसेच आरोग्यावरील दुष्परिणाम पाहता प्लास्टिक प्रतिबंधाच्या या उपक्रमातून स्वच्छतेची संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. घरात ठिकठिकाणी आढळून येणाºया प्लास्टिक पिशव्या गोळा करून त्या शाळेत आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा लागली आहे.

 

घरातील किचनमध्ये आढळणाऱ्या, बेडखाली दडपून ठेवलेल्या प्लास्टिक पिशव्या विद्यार्थी काढून घेतात. नंतर साठलेल्या पिशव्या महिन्यातून एकदा शाळेत जमा केल्या जातात. हे प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. सर्वाधिक प्लास्टिक गोळा करणाºया विद्यार्थ्यांचे शाळेकडून कौतुक करण्यात येते.- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल

 

 

 

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर