शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:44 IST

विद्यार्थ्यांची मागणी काय?

शिरवळ : राज्यभरातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेलेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण, तसेच विद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयांवरही बहिष्कार विद्यार्थ्यांद्वारे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय एरवी गजबजलेले असलेल्या या महाविद्यालयासमोर शुकशुकाट पसरला आहे.यासर्व महाविद्यालयातील चार हजार विद्यार्थ्यांनी १ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत असल्याने भविष्यात बेरोजगारांची नवी फौज सरकारला उभी करायची आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारण्यात आला. या आंदोलनामुळे सर्व ठिकाणी पशुचिकित्सालयांची सेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे उपचारासाठीचा फटका अनेक जणांना बसण्याची शक्यता आहे.

वास्तविक बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नसताना महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाची खरेच गरज आहे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय व तीन नियोजित शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे असतानाही नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करता खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचा उद्देश काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला गेला आहे.

विद्यार्थ्यांची मागणी काय?महाराष्ट्रात जवळपास साडेतीन कोटी पशुधन असताना, त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ६ हजार पशुचिकित्सकांची आवश्यकता आहे, परंतु जवळपास साडेदहा हजारांपेक्षा जास्त पशुचिकित्सक हे परवानाधारक आहेत. असे असतानाही सरकार खासगी महाविद्यालयांना परवानगी देऊन पशुवैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण, तर करतच आहे. सोबत भविष्यात बेरोजगारांची नवीन फळी उभी करत आहे. या सर्व बाबींचा विचार करून यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीagitationआंदोलन