विद्यार्थी हरवले ‘नंदनवना’च्या कुशीत

By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T22:05:39+5:302015-01-19T00:25:33+5:30

शैक्षणिक सहलींना प्रारंभ : महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमधील सहलींची संख्या अधिक

Students lose their 'nandvanwana' | विद्यार्थी हरवले ‘नंदनवना’च्या कुशीत

विद्यार्थी हरवले ‘नंदनवना’च्या कुशीत

सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून शैक्षणिक सहलींना सुरुवात झाली असून, महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरात राज्यांतून येणाऱ्या सहलींची संख्या अधिक आहे. दहा दिवसांत सुमारे १२५ सहलींनी नंदनवनाला भेट दिली आहे.महाबळेश्वरचा नावलौकिक जिल्हा व राज्यापुरता मर्यादित नसून ते एक जागतिक पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे हजेरी लावतात. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरात पहाटेच्या दवबिंदू गोठत असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच ठरली होती. वातावरणात होणाऱ्या या बदलाबरोबरच येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वरला आता शैक्षणिक सहलींचे वेध लागले आहे. शनिवार, रविवारी महाबळेश्वर पर्यटकांनी बहरत आहे, तर इतर दिवशी सहलींनी गजबजून जात आहे.दहा दिवसांमध्ये राज्यसह परराज्यातील सुमारे १२५ सहलींनी नंदनवनाला भेट देऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. येथे असणाऱ्या विविध पॉइंट, मंदिरे तसेच प्रतापगडाला भेट देऊन विद्यार्थी पर्यटनाचा मजा लुटताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी येथील बाजारपेठ विद्यार्थ्यांनी भरून जात आहे. पर्यटनाबरोबरच विद्यार्थी घोडेस्वारी व नौकाविहाराचा आनंद लुटताना दिसून येत आहे.शालेय सहलींची संख्या वाढल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. (प्रतिनिधी)

सहलींचे प्रमाण वाढलेबारमाही हंगाम असल्याने महाबळेश्वर व पाचगणी येथे तिन्ही ऋतूंत पर्यटक दाखल होतात. मात्र, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये याठिकाणी खऱ्या अर्थाने शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रातील पंढरपूर, धुळे, नागपूर, जळगाव, आष्टी, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणांबरोबरच कर्नाटक, गुजरात केरळ या राज्यांतून येणाऱ्या शैणक्षिक सहलींची संख्या अधिक आहे.

पर्यटक महाबळेश्वरला दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देतात. शालेय विद्यार्थ्यांना देखील इथला निसर्ग नेहमीच भुरळ घालतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वरला भेट देणाऱ्या शैक्षणिक सहलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा पर्यटनाबरोबरोच व्यापार वाढीस मोठा हातभार मिळत आहे.
- किरण नाविलकर, व्यावसायिक

Web Title: Students lose their 'nandvanwana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.