साताऱ्यात जोरदार, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 01:09 PM2021-06-17T13:09:43+5:302021-06-17T13:12:26+5:30

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धो-धो सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. तर कोयना धरणात दिवसांत जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा आला. तर तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.

Strong in Satara, wash in the western part of the district! | साताऱ्यात जोरदार, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो !

साताऱ्यात जोरदार, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो !

googlenewsNext
ठळक मुद्देकोयनेत ३ टीएमसी पाणी वाढले रस्त्यावर दरडी कोसळल्या, वाहतुकीवर परिणाम

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धो-धो सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. तर कोयना धरणात दिवसांत जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा आला. तर तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात सारखा पाऊस कोसळत आहे. बुधवारीही दमदार पाऊस झाला. तर सायंकाळपासून धो-धो पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना या भागात पावसाने उसंतच दिली नाही. त्यातच धरण परिसरातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

कोयना धरण परिसरात दोन दिवसांपासून जोर आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २५१ मिलीमीटर पाऊस पडला. तर धरणात २१६७२ क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. धरणातील पाणीसाठा ३१.६७ टीएमसी झाला. तर बुधवार सकाळपासून जवळपास ३ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

दरम्यान, कऱ्हाड तालुक्यालाही पावसाने झोडपले. मलकापूरसह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूर परिसरात महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाटण तालुक्यातील चाफळ विभागात दाढोली-महाबळवाडी दरम्यानच घाट रस्ता पहिल्याच पावसात खचून गेला. तसेच मोरीपूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली.

कऱ्हाडला ९८ तर महाबळेश्वरला १४३ मिलीमीटर पाऊसाची नोंद

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. बुधवारपासून गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.८ मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी १४३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी आहे.

सातारा - ४० (१४६.६), जावळी - ८०.१ (२३०.९), पाटण -८२.३ (१७०.३), कऱ्हाड - ९८.९ (२०३.७), कोरेगाव - २०.४ (१०४.४), खटाव - १५.१ (७८), माण - ४.६ (५७.२), फलटण - २.८ (६४.१), खंडाळा - ६.८ (७७.५) , वाई - १८.७ (१२८.४), महाबळेश्वर - १४३ (३८९).

Web Title: Strong in Satara, wash in the western part of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.