शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचं दमदार पुनरामगन; कोयना धरणात पाण्याची आवक वाढली 

By नितीन काळेल | Updated: September 9, 2023 13:05 IST

कोयनेला ३३५ मिलिमीटर पाऊस कमी..

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात उघडीप दिलेल्या पावसाचं दमदार पुनरामगन झाले असून, २४ तासांत नवजाला सर्वाधिक ११३ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ८६ टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व दुष्काळी भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू लागलाय. यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. पण, रब्बी हंगाम चांगला घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे. तर पश्चिमेकडेही चांगले पुनरामगन झाले आहे. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसाचा जोर आहे. यामुळे पुन्हा एकदा ओढे खळाळून वाहू लागलेत. भात खाचरात पाणी साठल्याने फायदा झाला आहे. त्यातच पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कण्हेर, उरमोडी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणांचीच पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसी आहे. त्यामुळे ही धरणे भरणे महत्त्वाचे आहे. सध्या उरमोडी वगळता सर्वच धरणात ८० टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. ही धरणे भरण्यासाठी सतत आणि दमदार पावसाची गरज आहे.पश्चिम भागातही तीन दिवसांपासून पावसाचे पुनरामगन झालेले आहे. धरणक्षेत्रातही पाऊस पडतोय. यामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढू लागला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ११३ मिलिमीटरची झाली. तर कोयनानगर येथे ८३ आणि महाबळेश्वरला ९२ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.

एक जूनपासूनचा विचार करता कोयनेला ३६३७, महाबळेश्वरमध्ये ४८८६ आणि नवजाला सर्वाधिक ५२०१ पावसाची नोंद झालेली आहे. तर धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ६७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झालेला. तरीही धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

कोयनेला ३३५ मिलिमीटर पाऊस कमी...जिल्ह्यात दरवर्षी कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडत असतो. यंदा मात्र, पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोयनेला ३३५, नवजाला २२ मिलिमीटर पाऊस कमी पडलेला आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलिमीटर अधिक पाऊस पडलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण