स्वच्छ, सुंदर मसूरसाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST2021-04-09T04:40:38+5:302021-04-09T04:40:38+5:30

येथील स्मशानभूमीच्या संरक्षक कंपाउण्ड जाळीच्या कामाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, दिलीपराज लंगडे, ...

Striving for clean, beautiful lentils | स्वच्छ, सुंदर मसूरसाठी प्रयत्नशील

स्वच्छ, सुंदर मसूरसाठी प्रयत्नशील

येथील स्मशानभूमीच्या संरक्षक कंपाउण्ड जाळीच्या कामाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, दिलीपराज लंगडे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांची उपस्थिती होती.

स्मशानभूमीला संरक्षक कंपाऊंडची आवश्यकता असल्यामुळे मानसिंगराव जगदाळे यांनी प्रयत्न करून विशेष फंडातून तीन लाख रुपये निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच पंकज दीक्षित यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

माजी सरपंच दिनकर शिरतोडे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चव्हाण, रमेश जाधव, विकास पाटोळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख, कासम पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी आभार मानले.

फोटो : ०८केआरडी०३

कॅप्शन : मसूर, ता. कऱ्हाड येथील स्मशानभूमीच्या संरक्षण कंपाउण्ड जाळीच्या कामाचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते झाले.

Web Title: Striving for clean, beautiful lentils