कडक संचारबंदीच्या नियमांची कोरेगावात काटेकोरपणे अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST2021-06-28T04:25:36+5:302021-06-28T04:25:36+5:30
कोरेगाव : कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी, रविवारी अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा ...

कडक संचारबंदीच्या नियमांची कोरेगावात काटेकोरपणे अंमलबजावणी
कोरेगाव : कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी, रविवारी अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी दिवसभरात २३ वाहनधारकांची अँटिजेन तपासणी करण्यात आली.
प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी या मोहिमेत भाग घेतला. तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी शिबिर घेतली जात आहेत. नगर पंचायतीचे प्रभाग अधिकारी प्रकाश बर्गे, अजित बर्गे यांच्यासह नगर पंचायतीचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.