कोयनेतून कर्नाटककडे पाणी सोडणे बंद

By Admin | Updated: April 30, 2016 00:57 IST2016-04-29T22:55:57+5:302016-04-30T00:57:37+5:30

सहा दिवसांत १ टीएमसी पाण्याचा विसर्ग

Stop the water from the Koyni to Karnataka | कोयनेतून कर्नाटककडे पाणी सोडणे बंद

कोयनेतून कर्नाटककडे पाणी सोडणे बंद

पाटण : पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढू लागेल तसतशी कोयना धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. कर्नाटकने १ टीएमसी पाणी मागणी केल्यानंतर २३ एप्रिल रोजी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी २ वाजता पुन्हा दरवाजे बंद करण्यात आले.सध्या कोयना धरणात केवळ २७.४५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ५०.६९ टीएमसी पाणी होते. पश्चिमेकडील वीजनिर्मितीची सयंत्रे जवळपास बंद ठेवण्यात आली आहेत. पूर्वेकडील सांगलीपर्यंतच्या गावाच्या पाणी पुरवठ्याच्या मागणीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून पाणी सोडणे चालूच आहे. (प्रतिनिधी)

३२ दिवस शिल्लक... यापुढे १ जूनपर्यंतचे ३२ दिवस ही अग्निपरीक्षा ठरणार आहे. कोयना धरणात केवळ २७.४५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ५ टीएमसी पाणीसाठा मृत स्वरूपात असतो. त्याचा वापर करता येत नाही. मग आता उर्वरित २२ टीएमसी पाणी थोडीफार वीजनिर्मिती व सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी कसे पुरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Stop the water from the Koyni to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.