शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सातारा शहरातील जुलमी वाहतूक व्यवस्था थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:19 IST

सातारा शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देसातारा शहरातील जुलमी वाहतूक व्यवस्था थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांना साकडेकर्मवीर पथावर दुहेरी वाहतूक सुरू करण्याची केली मागणी

सातारा : शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.पोलीस प्रशासनाने कर्मवीर पथावर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेट चौक या मार्गावर २ जुलैपासून वाहतुकीत बदल करण्यात आला. या निर्णयाविरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या असली तरी पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतलेली नाही.शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. या रस्त्यावर कधीही वाहतूक कोंडी होत नाही. या मार्गावर शाळा व महाविद्यालय आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून शेटे चौकाकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या मार्गावर अनेक अंतर्गत रस्ते आहेत. एकेरी वाहतुकीमुळे विद्यार्थी तसेस स्थानिक रहिवासी, व्यापारी यांची कोंडी झालेली आहे.एकेरी वाहतुकीबाबत कुठल्याही नागरिकाने अथवा व्यापाऱ्याने मागणी केलेली नाही. शेटे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने ग्राहक फिरकत नसल्याने व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शासनाला कर भरणारे व्यापारी वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील एकेरी वाहतूक तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.भरतशेठ राऊत, अशोक गांधी, सलीम खान, प्रशांत पांगे, राजेंद्र कळसकर, रियाज शेख, फारुख हकीम, इरफान कच्छी, अतुल माळी, भीमराव तपासे, सुशांत भस्मे, एजाज शेख, भाऊ जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या समस्येबाबत लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले.शहरातून हरकतीही मागविल्या नाहीतसातारा शहर वाहतूक पोलिसांनी या परिसरातील नागरिक व्यापारी वर्गाला कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच जाहीररीत्या कोणत्याही हरकती सूचना अथवा आक्षेप न मागवता मनमानीपणे दुहेरी वाहतूक बंद केली आहे. हा वाहनधारक, स्थानिक रहिवासी तसेच व्यापाऱ्यावर अन्याय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर