अवेळी पाणीपुरवठ्याविरोधात रास्ता रोको
By Admin | Updated: January 20, 2015 00:00 IST2015-01-19T22:44:27+5:302015-01-20T00:00:46+5:30
या परिसरात गेली वीस-पंचवीस वर्षांपासून पहाटे पावणेपाचला पाणी सोडले जात होते.

अवेळी पाणीपुरवठ्याविरोधात रास्ता रोको
सातारा : येथील कला वाणिज्य महाविद्यालय परिसरात वेळी-अवेळी पाणीपुरवठा केला जातो. नियमित पाणीपुरवठ्यासंदर्भात वेळोवेळी नगरसेवकांकडे तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर भांडी ठेवून रस्ता रोको केला.याबाबत माहिती अशी की, कला, वाणिज्य परिसर, झोपडपट्टीतील असंख्य नागरिक मजुरीची कामे करतात. या परिसरात गेली वीस-पंचवीस वर्षांपासून पहाटे पावणेपाचला पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाणी भरून सकाळी कामे उरकून तेथील मंडळी सकाळी सात पूर्वी त्यांच्या कामावर जात होते. त्यामुळे तेथील लोकांना ही वेळ सोयीची होती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून या वेळेत बदल झाला आहे. मात्र, पुरवठा करण्याच्या वेळा निश्चित नाहीत. सकाळी सात, आठ तर कधी नऊनंतरही पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या वेळेतच पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा नगरपालिका व नगरसेवकांकडे केली आहे. तरीही दखल न घेतल्याने सोमवारी आंदोलन केले. यावेळी धनंजय जांभळे, अमोल काकडे, गोविंद काळे, संदीप भांगे, बिपीन बामणे, दिलीप माने, विजय महाडिक, सुमन भुरावणे, विमल भोसले, लालाबाई काळे, लक्ष्मीबाई पवार, अंजना शिंदे, नीता पवार, मालन वाघमारे, सारिका हिरवे, उषा घाडगे, गंगू साळुंखे, रेखाबाई पवार, लीलाबाई जाधव, कुसूम पवार, राजश्री पवार, रेखाबाई भोसले, अनिता भोसले, साखरबाई पवार, अंबादास
काळे, गौरव पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)